महाराष्ट्र शिक्षक भरती 2023 | Maharashtra Shikshak Bharti 2023

राज्यामध्ये 34000 शिक्षकांची भरती होणार आहे याची घोषणा तर खूप वेळा झाली आहे पण त्या भरतीचा नियोजन बद्ध कार्यक्रम कसा असेल तो आपण पाहू
दिनांक २४/०३/२०२३ रोजी शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी २०२२ रोजीच्या निकालानंतरची शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरु करणे आवश्यक आहे.याबाबतची सध्यस्थिती अशा प्रकारे सादर करण्यात येत आहे.
शासन निर्णय दिनांक १०/११/२०२२ अन्वये सन २०२३ मध्ये झालेल्या शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणीनुसार येणाऱ्या पदभरतीच्या जाहिरातीसाठी उमेदवारांचे वय कोविड- १९ च्या पार्श्वभुमीवर २ वर्षासाठी शिथिलक्षम करण्यात आलेले आहे.
शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी २०२२ रोजीच्या निकालानंतर होणाऱ्या पदभरतीसाठी आवश्यकतेनुसार तीन महिन्यातुन एकदा व्यवस्थापनाकडून पोर्टलवर रिक्त पदांसाठीच्या जाहिराती घेण्यात येतील. या कालावधीमध्ये प्राप्त जाहिरातीमधुन पात्र उमेदवारांची व्यवस्थापननिहाय यादी नियुक्तीच्या शिफारसीसाठी यादी प्रसिध्द करण्यात येईल.
कोविड-१९ च्या पार्श्वभुमीवर सन २०१९-२० पासून शाळांच्या संच मान्यता जैसे थे ठेवण्यात आलेल्या होत्या.आता कोविड-१९ नंतर झालेले विद्यार्थ्याचे स्थलांतर,परिस्थितीतील बदल इत्यादी बाबी विचारात घेवून तसेच जनहित याचिका क्रमांक १०२/२०२१ मध्ये दिनांक ०१/०८/२०२२ रोजीच्या आदेशानुसार समिती गठीत करण्यात आलेली होती, सदर समितीच्या शिफारशीच्या आधारे उपाय योजना करण्याच्या अनुषंगाने शासनाने शासन निर्णय दिनांक ०६/०२/२०२३ अन्वये प्रत्यक्ष प्रवेशित विद्यार्थी संख्या निश्चित करण्यासाठी “आधार” वैध विद्यार्थी संख्या विचारात घेवून सन २०२२-२३ ची शिक्षक निश्चितीसाठी संच मान्यता करण्यात येत आहे. सद्यस्थितीत आधार वैध विद्यार्थी संख्येवर आधारित अंतरिम संच मान्यता करण्यात आलेल्या आहेत. आधार वैधतेची कार्यवाही पुर्ण झालेली नाही अशी विद्यार्थी वैधतेची कार्यवाही शाळास्तरावर सुरु आहे. ही कार्यवाही पुर्ण झाल्यानंतर अंतरिम करण्यात आलेल्या संच मान्यता दिनांक १५/०५/२०२३ पर्यंत अंतीम करण्याचे नियोजन आहे.
या अंतीम झालेल्या संच मान्यतांतील मंजूर पदांनुसार पदभरतीची कार्यवाही करणे आवश्यक आहे. ज्या ज्या व्यवस्थापनांकडून संच मान्यता २०२२-२३ ची कार्यवाही अंतीम होईल त्या त्या व्यवस्थापनांनी त्याचेकडील शिक्षक पदांची बिंदुनामावली प्रमाणित करुन पवित्र पोर्टलवर रिक्त पदांचे
जाहिरात देण्याबाबतचे निर्देश देणे आवश्यक आहे. याकरीताचे संभाव्य नियोजन पुढीलप्रमाणे सादर करण्यात येत आहे.
अ) संच मान्यता अंतीम करुन संच मान्यतेचे शाळानिहाय वितरण करण्यासाठी लागणारा एकुण संभाव्य कालावधी- दि.२०/०५/२०२३ पर्यंत.
ब) संच मान्यता अंतीम झाल्यानंतर व्यवस्थापनाकडून बिंदु नामावली इत्यादी प्रमाणित
करण्यासाठी लागणारा संभाव्य कालावधी- दिनांक ३०/०६/२०२३ पर्यंत.
क) शिक्षकांच्या रिक्त पदांची पोर्टलवर नोंद करणे (पहिल्या तिमाहीकरिता)- सुमारे १७/०७/२०२३ पर्यंत.
ड) पहिल्या तिमाहीकरिता प्राप्त जाहिरातीनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह पदभरतीसाठी
पात्र उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेणे,नियुक्तीसाठी शिफारस करणे इत्यादी बाबी पोर्टलमार्फत करणे-
दिनांक २०/०८/२०२३ पर्यंत. दरम्यानच्या कालात दुसऱ्या तिमाहीकरीता शिक्षकांच्या रिक्त पदांची
नोंद करणे.
तथापि, मागील शिक्षक पदभरतीतील जाहिरातीतील १२०७० पैकी मुलाखतीशिवाय पदभरतीमध्ये ५९७०
उमेदवारांची शिफारस झालेली आहे व मुलाखतीसह पदभरतीमध्ये १९३३ रिक्त पदांसाठी शिफारस झालेली असून एकुण ७९०३ रिक्त पदभरतीची कार्यवाही झालेली आहे. सध्यस्थितीत १९६ व्यवस्थापनांना एसईबीसी आरक्षणामुळे निवड प्रक्रिया पुर्ण न झालेल्या व्यवस्थापनाची निवड प्रक्रिया अंतीम टप्प्यात असून व्यवस्थापनांना मुलाखतीसाठी माहे मे,२०२३ मध्ये उमेदवार उपलब्ध होणार आहेत यातुन ७६९ रिक्त पदे भरली जातील.
तसेच याचिका क्र ११०८१/२०१९ मधील समांतर आरक्षणातील उमेदवारांना संधी देण्यासाठी शासन पत्र दिनांक १९/०४/२०२३ अन्वये स्थानिक स्वराज्य संस्थांतील अपात्र,गैरहजर,रुजू न झालेल्यांमुळे रिक्त राहिलेल्या पदांसाठी उमेदवारांना शिफारस करण्यास शासनाने परवानगी दिलेली आहे त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थातील अंदाजे ७५० रिक्त पदे भरली जाणार आहेत.
वर नमुद केल्याप्रमाणे शिक्षक पदभरतीचे मागील पदभरतीतील शिल्लक असलेले साधारणपणे १५००
रिक्त जागा तसेच शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी-२०२२ नुसार होणाऱ्या पदभरतीचे नियोजनाची वस्तुस्थिती सादर करण्यात करण्यात आली आहे.
असे असेल शिक्षक भरतीचे अंदाजित वेळापत्रक :-
📌15/5/2023 (पर्यत)संचमान्यता करणे
📌20/5/2023(पर्यत) संचमान्यता वितरित करणे
📌30/6/2023(पर्यत) मावक कडून बिंदूनामावली अद्यावत करून घेणे
📌15/7/2023(पर्यत) रिक्त पदे पोर्टलवर अपलोड करणे
📌20/8/2023(पर्यत)प्राधान्यक्रम देणे ,निवड ,नियुक्ती करणे
📌जाहिराती या एकाच टप्प्यात येणार नाहीत(स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित ) आवश्यक्तेनुसार 3 महिन्यातून एकदा जाहिरात पवित्र पोर्टलवर येईल
📌पहिल्या तिमाही करीता (पवित्र पोर्टल जाहिराती मधून)निवड झालेला उमेदवार पुनः नव्याने पुढील तिमाहीत आलेल्या जाहिरातीत प्राधान्य क्रम देऊन नियुक्त होऊ शकतो
Post a Comment